Breaking News

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी

दुबई ः वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनू साहनी यांना तातडीने पदावरून काढून टाकले आहे. साहनी यांच्यावर सहकार्‍यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांचा कार्यकाळ 2022मध्ये संपुष्टात येणार होता. आता त्यांच्या जागी जॉर्ज अल्लार्डिस कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.
साहनी यांच्यावर बरेच आरोप होते. एका वर्षापासून ते आपल्या कर्मचार्‍यांना योग्य वागणूक देत नव्हते. अनेक कर्मचार्‍यांनी साहनींविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीला साहनी यांना रजेवर पाठवण्यात आले होते.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply