नवी मुंबई ः बातमीदार
मुस्लिम बांधवाचा आनंदाचा मानला जाणारा पवित्र सण रमजान ईद हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईतील वाशी येथील नूर मशिद येथे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित मुस्लीम बांधवांनी सण साजरा केला व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून ठिकठिकाणी नमाज अदा केली जात असून नवी मुंबईत मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव ईद साजरी करताना दिसत आहेत. सकाळपासूनच मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती व गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.
या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, अब्दुल हमीद खान, अश्रफ नियाजी यांनी ही मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …