पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तर रायगडातील मंडल संपर्क प्रमुखांची नावे घोषित केली आहेत. कर्जत मंडल संपर्क प्रमुख म्हणून प्रकाश बिनेदार, खोपोली मंडल संपर्क प्रमुख सुनील नारायण घरत, खालापूर मंडल संपर्क प्रमुख विनोद सदाशिव साबळे, उरण मंडल संपर्क प्रमुख श्रीनंद मुकुंद पटवर्धन, पनवेल ग्रामीण मंडल संपर्क प्रमुख प्रल्हाद गोविंद केणी, कामोठे शहर मंडल संपर्क प्रमुख रमेश गणपत मुंढे, कळंबोली शहर मंडल संपर्क प्रमुख सनी दशरथ यादव आणि खारघर-तळोजे मंडल संपर्क प्रमुख म्हणून दीपक श्रीधर बेहेरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे अभिनंदन होत आहे.
Check Also
लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …