Breaking News

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच!


पाले बुद्रुक, फणसवाडीतील शेकाप आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक आणि फणसवाडीतील शेकाप आणि शिवसेना उबाठा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपच्या कार्यप्रणालीवर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यासर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, भाजप नेते प्रल्हाद केणी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, अंकूश पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, बुधाजी मोरावकर, लक्ष्मण उलवेकर, अविनाश उलवेकर, गोविंद म्हात्रे, प्रमोद भोपी, जनार्दन उलवेकर, नवनाथ खुटारकर, बाळकृृष्ण पाटील, नाथाशेठ आगलावे, भास्कर आगलावे, सुरेश आगलावे, भगवान दरे, सोपान आगलावे, दगडुशेठ आगलावे, डॉक्टर संतोष आगलावे, जनार्दन आगलावे, अंकुश पाटील, जितेश म्हात्रे, पवन भोईर, प्रगती उलवेकर, कुसुक उलवेकर, सविता उलवेकर, रानी मोरावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात दिपक उलवेकर यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाचे माजी सरपंच संजय जोमा भगत, माजी उपसरपंच संजय शंकर पारधी, सदस्य जोमा पारधी, जगु पारधी, मंगळ्या पारधी, शेकापचे माजी सदस्य पिंट्या भगत, काळुराम पारधी, बुधाजी पारधी, यांच्यासह जोमा भगत, अनंता पारधी, प्रकाश पारधी, निलेश पारधी, बाळकृष्णा पारधी, बाळु भगत, जोमा पारधी, मंगळ्या पारधी, संदिप पारधी, रमेश भगत, कमलाकर पारधी, धर्मा पारधी, पप्या पारधी, राजेश पारधी, मंगेश पारधी, राजू पारधी, सचिन पारधी, बाळु आंबो पारधी, सुनिता पारधी, छाया पारधी, गीता पारधी, सावीत्री पारधी, जेवंती पारधी, बाळू मंगळ्या पारधी, सुषामा पारधी, इंदु पारधी, पप्पी भगत, अनि भगत, सुनिता जोमाभगत, संगीता भगत,चांगी भगत, शैला पारधी, बळी पारधी, सुमन पारधी, सुनिता रमेश भगत, प्रेमा पारधी, प्रियमका पारधी, लिला पारधी, भिमा पारधी, बामी पारधी, पपी पारधी यांनी भाजपमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला.
दरम्यान, या वेळी भाजपच्या राज्य परिषद सदस्य पदी अरुणशेठ भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपस्थिती मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply