Breaking News

उद्धर येथे नागाला जीवदान

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील जयंत गोडबोले यांच्या घरात रविवारी (दि.26) रात्री मोठा नाग आढळून आला. येथील सर्पमित्र तुषार केळकर यांनी या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.  उंदरांच्या शोधात व गारवा मिळविण्यासाठी सध्या साप घरांमध्ये घुसण्याचे प्रमाण वाढत आहेत. असाच एक नाग रविवारी रात्री गोडबोले यांच्या घरात शिरला. नागाला बघून घरातल्या सर्वांची पाचावर बसली. त्यांनी येथील सर्पमित्र तुषार केळकर यांना बोलावून घेतले. तुषार यांनी ताबडतोब घटनास्थळी जावून नागाला शिताफीने पकडले.हा नाग सुमारे तीन साडेतीन फुट लांबीचा होता. केळकर यांनी त्या नागाला सोमवारी (दि. 27) सुरक्षीत ठिकाणी सोडून दिले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्यसंहितेचे पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‌‘ही परी अस्मानीची‌’ …

Leave a Reply