Breaking News

टेंभोडे परिसरात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने खळबळ

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिसराची तपासणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून खान्देश्वर पोलिसांनी नवी मुंबई बॉम्ब शोध व निकामी पथकाला पाचारण केले.  पथकाने बॉम्ब निकामी करणारा पेहराव परिधान करून यंत्र व श्वानपथकाच्या सहाय्याने हॅण्डग्रेनेड सदृश वस्तूची तपासणी केली.

या तपासणीत पथकाला सदर हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तूत कोणतेही स्फोटक पदार्थ आढळून आले नाही. तसेच ती रिकामी असल्याचे आढळून आले. सदर वस्तू या पथकाने ताब्यात घेतले असून ते कोणी व कशासाठी आणले याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. याबाबत माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली होती.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply