Breaking News

बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड सरस

अलिबाग ः प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील 91.94 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे. तरीदेखील रायगडने मुंबई विभागात रायगड अव्वल स्थान मिळवले आहे. जिल्ह्यात तळा तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97.30 टक्के लागला आहे.
फेब्रुवारी 2023मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 30 हजार 583 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी 28 हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलांपेक्षा मुली अधिक संख्येेन उत्तीर्ण झाल्या आहेत. 89.57 टक्के मुले, तर 94.48 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.

तालुकानिहाय टक्केवारी
तळा 97.30, पनवेल 96.58, म्हसळा 94.75, उरण 93.24, माणगाव 94.62, श्रीवर्धन 94.53, रोहा 92.65, अलिबाग 91.41, पेण 89.67, पोलादपूर 88.21, महाड 87.51, कर्जत 86.38, खालापूर 82.93, सुधागड 82.42, मुरूड 81.28.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply