Breaking News

बारावीच्या परीक्षेत कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेजचा 100 टक्के निकाल

कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सायन्स विभागामध्ये श्रेयश गजानन नाळे याने 85.66 टक्के तर कॉमर्स विभागात 84.50 टक्के गुण प्राप्त करून देवदिप दिनेश त्रिपाठी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स विभागातून बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 78 विद्यार्थी बसले असून सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या निकालात सायन्स विभागातून 85.66 टक्के गुण प्राप्त करुन श्रेयश गजानन नाळे याने प्रथम, सुप्रिया केदार चौधरी हीने 79.00 टक्के मिळवत द्वितीय तर चैतन्य संजय शेडगे याने 74.83 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कॉमर्स विभागात देवदिप दिनेश त्रिपाठी याने 84.50 टक्के गुण मिळवत प्रथम, 83.50 टक्के मिळवत ओम संजय चौधरी द्वितीय तर 81.16 टक्के गुण मिळवत अर्चिता विकास कांबळे तृतीय आली आहे.
सर्व उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, शाळा कमिटी चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply