Breaking News

सीकेटी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा

‘निकालांवर आधारित शिक्षण‘चे मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत निकालांवर आधारित शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. दीपक ननावरे (डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय सोलापूर आणि सदस्य, संचालक मंडळ आयक्यूएसी क्लस्टर इंडिया) यांचे स्वागत केले.

कार्यशाळेला प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. कोळी, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कला शाखा प्रमूख डॉ. यु. टी. भंडारे उपस्थित राहिले.

प्रत्येक स्वायत्त महाविद्यालय आपल्या अभ्याक्रमामध्ये, पाठ्यक्रमामध्ये बदल करत असते. बदलत्या अभ्यासक्रमानुसार त्या विषयाचे अभ्यासक्रम परिणाम आणि कार्यक्रम परिणाम त्यामधील जोड आणि त्याचे सादरीकरण करणे अवघड जाते. तसेच नवीन नियमांप्रमाणे हे परिणाम काढणे आणि त्याची अंमलबजावणी करणेही कठीण जाते. ह्या विषयाचा सखोल अभ्यास असणारे डॉ. दीपक ननावरे यांनी परिणाम कसे लिहिणे हे संक्षिप्त रूपात मांडले. या विषयावर विश्लेषण करताना सरांनी उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. त्यामुळे कार्यशाळेतील सर्व सहभागी प्राध्यापकांना अभ्यासक्रम परिणाम आणि कार्यक्रम परिणाम कसे लिहिणे हे समजणे सुलभ झाले. ह्या परिणामांची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना कसे सहभागी करून घेता येईल तसेच कोणते उपक्रम राबवता येतील याचेही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन डॉ. बी. डी. आघाव (आयक्यूएसी सहसमन्वयक) यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply