Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक; 58 उमेदवार रिंगणात

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाच सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सरपंच व सदस्य पदाच्या 31 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड आणि कर्जत तालुक्यातील तिवरे व वरई तर्फे निड या पाच ग्रामपंचायतींच्या पाच सरपंच व 39 सदस्यपदासाठी एकूण 122 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात 19 सरपंच व 103 सदस्यपद अर्जांचा समावेश होता. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. सरपंचपदाच्या 10 उमेदवारांनी माघार घेतली, तर एकाची बिनविरोध निवड झाली. आता एकूण चार सरपंचपदांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदाच्या 41 उमेदवारांनी माघार घेतली असून, 12 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे 27 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply