Breaking News

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपचे अरुणशेठ भगत, प्रितम पाटील, प्रशांत शिंदे व राजेश मपारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि. 6) जारी करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीत आमदार, जिल्हा परिषद सदस्यांबरोबर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियमातील कलम 3च्या पोटकलम 4मधील तरतुदीनुसार जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व्यक्तींची  जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते.
यानुसार जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले भाजपचे पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ जगन्नाथ भगत, पेणच्या नगराध्यक्ष प्रितम ललित पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश शरद मपारा, श्रीवर्धन तालुका मंडल अध्यक्ष प्रशांत विश्वनाथ शिंदे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ बालदी, आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply