Breaking News

‘नऊ वर्षांची देशाची वाटचाल सर्वाधिक तेजस्वी’

महाजनसंपर्क अभियानांतर्गत प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पनवेलमध्ये साधला संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ता सागर भदे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अविनाश कोळी, जिल्हा प्रवक्ता प्रकाश बिनेदार, विनोद साबळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते.
केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने सरकार असताना देवेंद्रजींची सुरक्षा कमी केली होती, मात्र आता ठाकरे यांची सुरक्षा कमी केली नसतानाही संजय राऊत दररोज खोटे बोलण्याचा महापराक्रम करीत आहेत. अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदात रस नाही, नाना पटोलेंना त्यांच्या पक्षात कुणीही अध्यक्ष मानत नाही तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष राहिला नाही, त्यामुळे महाविकास आघाडी नाही तर महाहतबल आघाडी झाली आहे.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने मोदी @ 9 महासंपर्क अभियान अंतर्गत सेलिब्रेशनऐवजी नागरिकांशी कम्युनिकेशन असे कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण हे तीन मतदार संघ येतात. त्या अनुषंगाने या तीनही मतदार संघात विविध कार्यक्रमे पार पडत आहेत. त्यामध्ये टिफिन बैठक, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन, योग दिन, लाभार्थी संमेलन, विकास तीर्थ, व्यापारी संमेलन, प्रबुद्ध नागरी संमेलन, व्हर्चुअल रॅली, घरोघरी संपर्क, विशाल रॅली, जाहीर सभा अशा विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply