पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच त्यांच्या आणि विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकार्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वीजपुरवठा व त्या अनुषंगाने तक्रारी लक्षात घेता त्याचे निवारण होण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस येताना वीज ग्राहकांनी, विविध सोसाट्यांनी केलेल्या तक्रारींचा अर्ज तसेच लेखी स्वरूपात समस्या लिहून सोबत घेऊन वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …