मुंबई : नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांची अभिनंदनपर भाषणे झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी केला होता. पंतप्रधानांनी विनंती केली होती की, सर्व राज्यांनी व्हॅट कमी करावा. त्यानुसार इतर राज्यांनीदेखील व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने पाच पैसेदेखील कमी केले नव्हते. आता आमचे युतीचे सरकार हा व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. याशिवाय हिरकणी गाव वाचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 21 कोटींचा निधी देणार असल्याची मी घोषणा करतो.
या राज्यातील सर्वांत महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे बळीराजा. त्याच्या बांधावर सगळेच लोक जाऊन त्याची विचारपूस करतात. या शेतकर्याच्या जीवनातदेखील सुखाचे क्षण यावेत म्हणून शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षांचे सगळ्यांच योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल. सत्ताधारी व विरोधी पक्षाने हातात हात घालून काम करूयात. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …