उरण : बातमीदार
पिरकोन सारडेगाव रोडच्या कडेला एक लाल रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा कोणताही सुगावा नसताना उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खुनाचा उलगडा 16 तासांत उघडकीस आणला.
सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेवुन तपासाला गती दिली. त्यानुसार डोंबिवली येथील महिलेच्या घराशेजारी व्यक्तींकडे चौकशी करता मयत महिला हिला तीचा पोयनाड, अलिबाग येथील जावई याचा फोन आल्यानंतर मुलीला भेटण्याकरीता त्या 9 जुलै रोजी घरून निघाल्या असल्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे जावयाने मयत महिलेस बोलावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने जावयाचा पोयनाड, अलिबाग येथे जावुन शोध घेताना जावई मयुरेश अजित गंभीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन सध्या तडीपार करण्यात आलेला आहे असे समजल्याने उरण पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाची सर्व यंत्रणा, त्याची व त्याच्या सहकार्यांची माहिती गोळा करण्यासाठी तत्परतेने कामाला लागली.
तेव्हा तो पालावा, खोणी, डोबिवली (पूर्व) येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून मयुरेश अजित गंभीर व त्याचा साथिदार दिलीप अशोक गुंजलेकर यांना ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत आणखीन दोन साथीदार असल्याचे समजले. आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांची 18 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
रिमांड मुदतीत आरोपींकडे सखोल चौकशी करता मयुरेश अजित गंभीर याने त्याची दुसरी पत्नी प्रिती गंभीर हिला अलिबागच्या नागाव या हॉटेलवर खुन केला व आरोपी दिलीप अशोक गुंजलेकर, दिपक उर्फ बाबु बजरंग निशाद व अबरार अन्वर शेख तसेच त्यांचे साथीदार यांनी प्रितीचा मृतदेह धरंमतरखाडी, वडखळ (अलिबाग) यामध्ये टाकून पुरावा नष्ट केल्याचे त्यांनी कबुली दिली आहे.
अशाप्रकारे उरण पोलीस ठाणे हद्दीत सारडेगाव शिवारात मिळालेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा तसेच तीची मुलगी प्रिती हिच्या खुनाचा गुन्हा 11 महिन्यानंतर असे दुहेरी हत्याकांडाचे गुन्हे उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवुन 16 तासांत उघडकीस आणण्यात यश आले आहे.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …