Breaking News

एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार

मुंबई : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीत असणार्‍या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा एनडीआरएफचा बेस कॅम्प याच जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्याकरिता आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेवून असून आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य वेगाने सुरू आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदतकार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाहीये.

Check Also

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात …

Leave a Reply