Breaking News

पुष्पक नोड नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षणासाठी तारेची संरक्षण भिंत

20 कोटींचा निधी मंजूर; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने पुनर्वसन झालेल्या पुष्पक नोड सेक्टर 1 नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षण होण्याकरिता तारेची संरक्षण भिंत उभारण्यात येणार असून याकामी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सिडकोमार्फत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
वरचे ओवळे गावाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या अनुषंगाने पुनर्वसन झाले आहे. महात्मा फुले कॉलेजच्या शेजारी पुष्पक नोड सेक्टर 1 येथे हे पुनवर्सन नवीन वरचे ओवळे या नावाने झाले आहे. या ठिकाणी गावाच्या बाजूला मोठा डोंगर आहे आणि या डोंगरालगत ये-जा करण्यासाठी मार्ग आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन इमारतींना व रहिवाशांना धोका निर्माण झाला असून सर्व मार्ग मातीखाली गेले आहेत. त्यामुळे डोंगर बाजूने सुरक्षा होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली होती.
याबाबत आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर डोंगराला करण्यात आलेल्या मजबूत तारांचे आवरणाप्रमाणे या ठिकाणी डोंगराला मजबूत तारांची संरक्षक भिंत उभारण्याची मान्यता देण्यात आली असून त्यासाठी सिडकोने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या संदर्भात निविदा प्रकियाही करण्यात आली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply