पनवेल : रामप्रहर वृत्त
पंजाब येथे झालेल्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या पनवेलमधील ऋषिकेश पेंडकर याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नेपाळ येथे होणार्या मिस्टर एशिया स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकर पनवेल प्रभाग क्रमांक 19मधील रहिवासी असून त्याने नुकताच पंजाब येथे झालेल्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर त्याची गोवा येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून नेपाळ येथे होणार्या मिस्टर एशिया आणि कोरिया येथे होणार्या मिस्टर वर्ल्ड या स्पर्धेसाठीसुद्धा महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. याबद्दल पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ऋषिकेशचे गुुरुवारी (दि. 31) अभिनंदन करून त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या वेळी अॅड. चेतन जाधव उपस्थित होते.
Check Also
उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन
परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …