विद्युत समस्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा आमदार नाईक यांचा इशारा

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई शहरातील विविध भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. नागरिकांनी देखील कार्यालयाकडे अनेकदा वीज समस्येसंदर्भात निवेदने दिली आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन समस्येचे निवारण केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जर पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या समस्याची सोडवणूक करण्यास चालढकल अथवा दिरंगाई होऊन वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरु राहिल्यास याबाबत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी महावितरणच्या वाशी मंडळातील विद्युत अधीक्षकांना पत्राद्वारे दिला आहे.

विद्युत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकारदेखील घडत असल्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. उघड्या विद्युत वाहिनेमुळे शॉक लागण्याच्या अनेक घटना घडत असल्यामुळे महावितरणाच्या या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई शहरातील आपल्या विभागाशी निगडीत असलेल्या मान्सूनपूर्व कामांबाबत तसेच पावसाळ्यामध्ये शहरात कुठेही उघड्या विद्युत वाहिन्यामुळे शॉक लागण्याच्या घटना किंवा शॉक लागून दुर्दैवी अपघात होऊ नये याकरिता खबरदारीच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना संदर्भात आमदार गणेश नाईक यांनी अनेकदा निवेदने सादर केले आहेत. तसेच घणसोली विभाग कार्यालयासमोर नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत तसेच परिसरातील विद्युत केबल नव्याने टाकण्याबाबतचे लेखी निवेदन 13 मे रोजी सादर केले आहे.

त्याअनुषंगाने काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे याबाबतची माहिती अवगत करुन द्यावी अशी विचारणा आमदार नाईक यांनी पत्रात केली आहे. तसेच नवी मुंबई शहरातील विशेषतः कोपरखैरणे, घणसोली, गोठिवली या परिसरामध्ये वीज पुरवठा सुरळीत राहण्याकरिता दर्जेदार जनित्रे व अन्य आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. तरी पुढील काही दिवसांमध्ये वीजेच्या समस्याची सोडवणूक करण्यास चालढकल अथवा दिरंगाई होऊन वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरु राहिल्यास याबाबत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार नाईक यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply