Breaking News

स्वच्छतेसाठी पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तक

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या वतीने हे रुग्णालय दत्तक घेतल्याचे महापाालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अर्थात सेवा पंधरवड्यानिमित्त स्वच्छता ही सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि. यांच्या वतीने रविवारी (दि. 1) पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या शुभारंभ कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक राजू सोनी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यतिन देशमुख, डॉ. मधुकर पांचाळ, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ उपेंद्र मराठे, डॉ. अरुणा पोहरे व रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना परेश ठाकूर यांनी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांची सेवा चांगली असूनही स्वच्छतेबद्दल नातेवाईक नाखुष असतात. त्यामुळे आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील स्वच्छता करण्यासाठी एक वर्ष कर्मचारी नेमण्याचे ठरवले असले तरी वेळ पडली, तर जास्त काळ आम्ही ही सेवा पूरवू, असे जाहीर केले.
श्रीनंद पटवर्धन यांनी या उपजिल्हा रुग्णालयाला कशी मान्यता मिळाली याची माळहती दिली. मयुरेश नेतकर व डॉ. मधुकर पांचाळ यांनीही आपले विचार मांडले, तर डॉ. अरुणा पोहरे यांनी आभार मानले.

रुग्णालयातील डॉक्टर चांगली सेवा देतात. परिचारिका व कर्मचारी चांगले वागतात. या इमारतीची स्वच्छता राखण्याची जबाबदारी रुग्णाच्या नातेवाईकांचीही आहे. आपला रुग्ण लवकर बरा होण्यासाठी स्वच्छता हवी. येथे गुटखा खाऊन थुंकू नये वा घाण करू नये.
-गणेश, रुग्णाचा नातेवाईक

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply