पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने प्रभाग 17मधील नवनाथ नगर, माल धक्का, शिवाजी नगर, लोकमान्य नगर, गणेश नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वाटप कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, विजय म्हात्रे, चंद्रकांत मंजुळे, मधुकर उरणकर, अशोक आंबेकर, जितेंद्र वाघमारे, राहुल वाहुळकर, जरीना शेख, आनंद गुरव, रावसाहेब खरात, नंदा टापरे, तानाजी शिंदे, विलास इंगवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RamPrahar – The Panvel Daily Paper