Breaking News

हरिग्रामच्या शेकाप सरपंच निर्मला वाघमारे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला असून हरिग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला रामदास वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मतदारसंघाचा वेगाने विकास होत आहे. या विकासगंगेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहे. त्यानुसार शेकापला जोरदार धक्का देत हरिग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल येथील निवास्थानी झालेल्या या कार्यक्रमात सरपंच निर्मला रामदास वाघमारे, रामदास वाघमारे, तुकाराम वाघमारे, भास्कर वाघमारे, दत्ता वाघमारे, गुरूनाथ वाघमारे, पांडुरंग वाघमारे, मधुकर वाघमारे, कैलास वाघमारे, अनंता वाघमारे, जनार्दन वाघमारे, जयराम कातकरी, विठ्ठल वाघमारे, रमेश वाघमारे, सन्नी वाघमारे, अर्जुन वाघमारे, गणेश वाघमारे, महेश वाघमारे, संगीता वाघमारे, बेबी पारधी, शुभम वाघमारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वगात करून जो विश्वास ठेवून सर्वांनी प्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल, अशी ग्वाही दिली.
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सुनील पाटील, खेरणेचे सरपंच शैलेश माळी, वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पवार, भाजपचे हरिग्राम ग्रामपंचायत सदस्य जोत्स्ना म्हात्रे, जागृती माळी, श्रीनिवास म्हात्रे, माजी सरपंच रामा ठाकरे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, माजी सदस्य धनाजी म्हात्रे, बुधाजी पारधी, युवा कार्यकर्ते जयेश पाटील, रवींद्र म्हात्रे, अशोक माळी, नवनाथ म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, बाळू म्हात्रे, बाळकृष्ण म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, पवन म्हात्रे, विष्णू म्हात्रे, दत्ता म्हात्रे, भरत भोपी, हिर्‍या पारधी, सुनील पाटील, चंद्रकांत म्हात्रे, सनिदेव म्हात्रे, राजाराम काळे, बादल जावळे, गणेश चौघुले, रामदास म्हात्रे, सचिन सावंत, राम वाघे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply