Breaking News

शेकापला वावेघरमध्ये पुन्हा एकदा झटका

रसायनी ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील वावेघर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजप पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी शेकापचे ज्येष्ठ नेते गोविंदशेठ राठोड, युवा नेते हुसेन मुल्ला यांच्यासह गोविंद चव्हाण, खेमू चव्हाण, कृष्णा शिंदे, अनिल राठोड, शंकर बंडगर, अंकुर पांडे, जब्बार मुल्ला, रवी पवार, अरिफ शेख, राकेश धोत्रे, अनिस मुल्ला, शफिकूल शेख, सचिन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी विकासाचे ‘कमळ‘ हाती घेतले. आमदार महेश बालदी यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, गुळसुंदे जि.प. विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पं.स. विभागीय अध्यक्ष सुनील माळी, झोपडपट्टी सेल तालुकाध्यक्ष महादेव कांबळे, माजी सरपंच विजय चव्हाण, उमेदवार रामचंद्र माने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply