Breaking News

चिरनेरमध्ये भाजप बाजी मारणार

ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून, येथे राजकीय हालचाली व प्रचाराला वेग आला आहे, मात्र ही ग्रामपंचायतची निवडणूक जिंकून भाजप बाजी मारणार, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खारपाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच चिरनेर ग्रामपंचायत भाजपकडे येणार असल्याचे मत भाजपचे अनुभवी कार्यकर्ते समीर खारपाटील, सागर खारपाटील, करण पाटील, प्रकाश गोंधळी, संजय गोंधळी, संताजी गोंधळी, सुशांत पाटील, स्वप्निल पाटील, माजी उपसरपंच प्रियांका पाटील, संदीप गोंधळी, अनिकेत गोंधळी, सुजित पाटील स्वप्निल खारपाटील, नमस्ते मोकल, योगेश खारपाटील, जयेश खारपाटील तसेच भाजपचे अन्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. चिरनेर गावाची एकूण नऊ हजार 500 इतकी लोकसंख्या असलेल्या चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पाच प्रभागात चार हजार 840 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते जोरात काम करताना दिसत आहेत. या वेळी भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी यांच्याशी प्रचारादरम्यान संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर अनेक विकास कामांची पूर्तता आणि विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पाच प्रभागात कार्यकर्ते पूर्णपणे चाचपणी करून, उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी एक दिलाने व जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. उमेदवार रमेश फोफेरकर, सुशील पाटील, रमेश गोंधळी, प्रणोती पाटील, वनश्री खारपाटील, सरिता खारपाटील, मेघा चिर्लेकर, अश्विनी नारंगीकर, अश्विनी कातकरी, सिताराम कातकरी समीर डुंगीकर, अंकित म्हात्रे, अजिंक्य ठाकूर, हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात असून, प्रचारात त्यांना जनतेचा कौल मिळत असून, त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

चिरनेर ग्रामपंचायतची निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढवीत असून,जनतेचे मूलभूत प्रश्न व समस्या सोडवण्याची जबाबदारी घेत, भाजप खर्‍या अर्थाने विकास कामांना चालना देत राहील.
पी. पी. खारपाटील, ज्येष्ठ नेते भाजप, उद्योगपती

आम्ही विकास कामांचा आव आणणार नाही, तर विकासाची कामे प्रत्यक्षात करून दाखवू.
-राजेंद्र खारपाटील, भाजप नेते व उद्योगपती

 

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply