Breaking News

न्हावे येथे उत्कर्ष ग्रामविकास मंडळाची रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 29) प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर; प्रभाग क्रमांक 2मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनिता भोईर; प्रभाग क्रमांक 3मधून सविता ठाकूर, जागृती भोईर; प्रभाग क्रमांक 4मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. यांच्या प्रचारासाठी न्हावे परिसरात रविवारी प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी मतदारांपर्यत्त पोहचून उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सी. एल. ठाकूर, सागर ठाकूव, चंद्रकांत भोईर, माजी उपसरपंच किरण पाटील, जे. बी. म्हात्रे, किशोर भोई, दिपक भोईर, राजेश म्हात्रे, शैलेश पाटील, नितीन भोईर, तुषार भोईर, दीपक भोईर, चंद्रकात पाटील, मिनाक्षी पाटील, रंजना घरत, वासंती भोईर, शोभा भोईर, जागृती म्हात्रे, सविता ठाकूर, संदीप म्हात्रे, केतन बेंद्रे, रंजना पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply