डोंबिवली : रामप्रहर वृत्त
सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाले.
सन 2004पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव या समाज सोहळ्याच्या आयोजनास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव 13 ते 20 डिसेंबरदरम्यान डोंबिवली पूर्व येथील श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आगरी युथ फोरमच्या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी. या पर्वणीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर या महोत्सवाला भेट देऊन मनमुराद आनंद घेत आहेत. आगरी महोत्सव सोहळ्यास कौटुंबिक मनोरंजनाचे पॅकेज आहे. यामध्ये विविध प्रकारचे शॉपिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, भजन, सामाजिक विषयांवर चर्चासत्रे आणि तरुणांसाठी मोठ्या मनिरंजन पार्कसह वादविवादाचा समावेश आहे. बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाइल्स, रिअल इस्टेड, ग्राहक वस्तू, पर्यटन, सौंदर्य प्रसाधने, फॅशन आणि हस्तकला यांसारखे 150हून अधिक स्टॉल्स आहेत.
या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी माजी आमदार सुभाष भोईर, ठाणे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, आगरी कोळी मेडीकॉटचे दिनेश म्हात्रे, आगरी महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …