Breaking News

सीकेटी महाविद्यालयात निर्मिती फॅशन शो

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्मिती फॅशन शो 2023-2024चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लागली. निर्मिती फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी 11 थीम सादर केल्या. यंदाचे निर्मिती समारंभाचे 20वे वर्ष होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंडिया फॅशन गुरु सोनिया मेअर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर ज्युरी सदस्य म्हणून श्वेता वोरा, शंतनू किराणे आणि प्राचार्य एस. के. पाटील उपस्थित होते. या वेळी विद्यार्थी आपल्या विविध कलागुणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सुचित्रा गवळे, हर्षा ठक्कर, अनुपमा पाठारे, संजना दलाल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply