Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार; तर कामगार नेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्ररत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कोकण दर्पण वृत्तपत्राचा 13वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा रविवारी (दि.28) नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार गणेश नाईक, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार, कामगार नेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्ररत्न पुरस्कार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गायक मुकेश गुप्ता आणि कामिनी गुप्ता यांचा सरगम-सुरों की दुनिया हा गजल आणि कव्वाली गीतांचा कार्यक्रम तसेच एआयआयआयटीएस संयोजित आंतर महाविद्यालयीन नृत्य स्पर्धा झाली. वर्धापन दिन सोहळ्याचे संयोजन कोकण रहिवासी संघ आणि नवी मुंबई, पनवेलमधील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी केले होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply