Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पेण : प्रतिनिधी

भाजप आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि. 15) विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या. पेण नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील विश्वेश्वर मैदानात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. म्हाडा कॉलनी येथे आमराई ते कुंभारआळी ते विश्वेश्वर जोड रस्त्याचे लोकार्पण, तसेच म्हाडा कॉलनी येथील वाचनालयाचे भूमिपूजन करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या वतीने जैन समाज हॉल, नगर परिषद कार्यालयासमोर, होळीचा माळ फणसडोंगरी, चिंचपाडा, नरदास चाळ, अंतोरे रोड व शिक्षक सोसायटी येथे बसविण्यात आलेल्या सोलरमास्ट दिव्यांचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रोहिदास नगर येथील समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या उपनगरध्यक्षा वैशाली कडू, सभापती राजेश म्हात्रे, तेजस्विनी नेने, नगरसेवक अजय क्षीरसागर, नगरसेविका शहनाज मुजावर, देवता साकोस्कर, नलिनी पवार, अश्विनी शहा, माजी सभापती प्रकाश पाटील, दिलीप लाड, संदीप सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, भाजप शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सुप्रिया चव्हाण, नगर परिषदेचे कार्यालयीन प्रशासक राजाराम नरुटे, पथदीप अधिकारी शिवाजी चव्हाण यांच्यासह भाजप कार्यकर्ते व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. आमदार रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत पेण शहरात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढेही पेण नगरीचा विकास करण्यावर आमचा भर राहील, असे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, आमदार रविशेठ पाटील यांना अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, तसेच भ्रमणध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply