Breaking News

भाजपच्या गाव चलो अभियानासंदर्भात पनवेलमध्ये बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका कार्यकारिणीची बैठक मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) झाली. या बैठकीत गाव चलो अभियानावर चर्चा करण्यात आली.
पनवेल तालुका भाजप कार्यकारिणीची बैठक शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रल्हाद केणी, माजी पं.स.सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष व शिवकरचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत गाव चलो अभियान विषयावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली विकासकामे, योजना, निर्णय, उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 फेब्रुवारीपासून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या वेळी दिली.
स्व. निळकंठ घरत यांना आदरांजली
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष व उरणमधील चिर्ले गावचे भूमिपुत्र निळकंठ घरत यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना या बैठकीत आदरांजली अर्पण करण्यात आली. घरत यांच्या जाण्याने एक चांगला पदाधिकारी गमावल्याची भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply