Breaking News

पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे त्वरित हटवा

अन्यथा आक्रमक होण्याची हिंदू समाजाची भूमिका

पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे महापालिकेने येत्या सात दिवसांत न तोडल्यास सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार अशी निर्धार भूमिका पत्रकारांशी संवाद साधताना निलेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
या वेळी निलेश पाटील यांच्यासह परेश मुरबाडकर, संजय मुरकुटे, कुणाल कुरघोडे व सकल हिंदू समाजाचे समाज बांधव या वेळी उपस्थित होते. या वेळी त्यांनी सांगितले की, पनवेल शहरात श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुर्वीपासून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आनंदाच्या क्षणी समाजात तेढ निर्मांण होऊ नये म्हणून आम्ही आजवर कोणतीही भूमिका घेतली नाही. एक दुर्दैवी घटना घडूनही आम्ही कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया न घेता केवळ मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करून निषेध नोंदवून सामंज्यस्याची भूमिका घेतली. महाआरतींना मिळालेल्या हिंदू बांधवांचा प्रतिसाद पाहून पोलीस प्रशासनाने त्या घटनेत अनेक आरोपी अटक केले. गुन्हे दाखल केले. पोलिसांना सहकार्याची भूमिका घेवून आम्ही शांत असताना पुन्हा एकदा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला. तसेच साईनगरमधील साईराज पॅरेडाईस या इमारतीत काही हिंदू बांधवांनी सोसायटीच्या आवारात मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. याच इमारतीत राहणार्‍या अल्पसंख्याक समाजाने या मंदिराला विरोध केला. पनवेल महापालिकेकडे लेखी तक्रार केली. 5 फेब्रुवारीला सकाळी अर्ज करताच पनवेल महापालिका प्रशासनाने अवघ्या काही तासात सोसायटीच्या आवारात जावून बांधकाम तोडले. तक्रारदाराच्या अर्जांला प्रत्युत्तरदेखील दिले. पनवेल महापालिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू असताना पालिका प्रशासन एवढे तत्पर कसे असा सवाल त्यांनी केला आहे. सकाळी आलेल्या अर्जांवर काही तासांत कारवाई करण्याची एवढे वेगवान काम महापालिकेने केले कसे. विशेष म्हणजे आम्ही 24 जानेवारीला काही ठराविक लोकांकडून होणार्‍या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
महापालिकेने आमच्या पत्राची दखल दहा दिवस झाले घेतली नाही, परंतु त्यांच्या पत्रावर अवघ्या काही तासांत कारवाई होते ही घटना आपल्या पनवेल शहरात घडत असताना आम्ही शांत बघत बसायचे का असा त्यांच्या प्रश्न आहे. शहरात उघडपणे बेकायदा बांधकामे केली जात आहे. अतिक्रमण विरोधी पथकाला लाखो रूपयांचा विनाकारण खर्च केला जात आहे. तरीही अतिक्रमणे जैसे थे आहेत, परंतु एका सोसायटीच्या आवारातील मंदिर सुरू होताच तातडीने मंदिर पाडणारे प्रशासन हिंदूविरोधी आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.
राष्ट्रप्रेमी नागरिकांनी शहरातील एक रस्त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने वेगवेगळी कारणे सांगून नाव देण्यास टाळाटाळ केली, परंतु खारघरमधील एका शाळेच्या संबंधित व्यक्तीचे नाव शाळेसमोरील रस्त्याला देण्याचा ठराव मात्र याच महापालिका प्रशासनाने घेतला. सावरकरांचे नाव देण्यास टाळाटाळ करणारे प्रशासन हिंदूविरोधी आहे हे यावरून सिध्द होते. शहरातील बेकायदा बांधकामे, अतिक्रमण तोडण्याची हिंमत प्रशासनात नाही. प्रशासनाने कारवाई केली नाही म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले आहे. आम्ही कारवाईची मागणी केली आहे. तरीदेखील कारवाई झाली नाही तर यापुढे आक्रमक भूमिका घेऊन पुढील आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. येत्या सात दिवसांत कारवाई करावी पनवेल शहराशी काहीही संबंध नसलेल्या लोकांनी भारत नगर वसविले. महापालिका त्यांना पक्की घरे बांधून देणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या विरोधात हायकोर्टांत गेलेल्या या लोकांना महापालिकेला संमतीपत्र देऊन घरे रिकामे करण्यास सांगितली आहेत, परंतु महापालिकेला हे सहकार्य करीत नाही. तरी महापालिका त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेत नाही याचा अर्थ प्रशासन या बेकायदा लोकांना शहरात पोसण्याचे काम करते आहे. तरी य सर्व गोष्टींवर महापालिकेने येत्या सात दिवसांत कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिला आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply