Breaking News

पनवेल खानावलेतील ठाकरे गटाचे कार्यक्रर्ते भाजपत

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

उरण ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील खानावले ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे विद्यमान सरपंच जयश्री सुभाष नाईक यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे उपतालुकाध्यक्ष प्रवीण खंडागळे, पनवेल माजी उपसभापती देविदास पाटील, खानावले ग्रामपंचायत सदस्य गणेश आगिवले, महेंद्र पाटील, युवा कार्यकर्ता गणेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी सरपंच जयश्री सुभाष नाईक यांच्यासह गोपाळ नाईक, कमलाकर कातकरी, अनिल सवार, सुनील कातकरी, रमेश कातकरी, संजय नाईक, मुक्ता सवार, काळुबाई कातकरी, सुनीता नाईक, माणिक नाईक, सुंदर कातकरी, हरिभाऊ नाईक यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply