Breaking News

पनवेलच्या प्रशासकीय भवनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगतिपथावर असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) याची पाहणी करून आढावा घेतला.
शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, जेणेकरून नागरिकांच्या वेळ व पैशांची बचत होईल या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून पनवेल शहरातील पूर्वीच्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेवर प्रशासकीय भवन साकारत आहे. तळमजला व तीन मजली अशा या भवनाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि याबाबतची माहिती अधिकारीवर्गाकडून घेतली.
या पाहणीवेळी तहसीलदार विजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम, विद्युत विभाग उपअभियंता श्रीमती जाधव, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगत आदी उपस्थित होते. प्रशासकीय भवनाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून एप्रिल किंवा मे महिन्यात उद्घाटनानंतर हे भवन नागरिकांसाठी खुले होईल, असे या वेळी अधिकारीवर्गाने सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply