Breaking News

सीकेटी महाविद्यालयात रक्तदान शिबिर

स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि सर जे. जे. रुग्णालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तथा स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या 96व्या जयंतीनिमित्त सीकेटी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.21)करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या शिबिराला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला असून 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. नारखेडे, एनएसएस विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एन. परकाळे, वरिष्ठ महिला कार्यक्रम अधिकारी आणि शिबिराच्या समन्वयक डॉ. योजना मुनिव, कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील, प्रा. राहुल पाटील, प्रा. आलोक भानुशाली, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली पाटील, एनएसएस विषय शिक्षक प्रा. रुपेश माने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply