Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे बीड, तळोजे मजकूर, चाळ, नागझरी, आडिवली, धानसर, आणि करवले या गावातील गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप मंगळवारी तळोजे मजकूर येथील शिवमंदीरामध्ये पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, भूमी अभिलेख कोकण प्रदेश उप संचालक जयंत निकम, जिल्हा अधिक्षक सचिन इंगळे, पनवेल महानगरपालिका नगररचना उप संचालक ज्योती कवाडे, उपअधिक्षक प्रदिप जगताप, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकुण 30 गावे समाविष्ट असून यातील एमएमआरडीए क्षेत्रातील 11 गावांचे आणि सिडकोकडील 13 गावे असे एकुण 24 गावांच्या गावठाणातील मालमत्तांचे मालमत्ता पत्रक करण्याबाबतच्या सूचना भूमीलेख अभिलेख विभागाकडून महापालिकेस आल्या होत्या. यापैकी 7 गावांच्या मालमत्तांची मोजणी पुर्ण करून एकुण 725 मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत. या मालमत्ता पत्रकांचे वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उरलेल्या मालमत्ताधारकांनाही लाभ देऊ -आमदार प्रशांत ठाकूर
या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महापालिका कार्यक्षेत्रातील स्केअर फूटवरती जमीनच्या किंमती गेलेल्या आहेत. अशा वेळी मालमत्ताधारकांना स्वतःच्या मालमत्ताचे मालमत्ता पत्रक असणे महत्त्वाचे आहे. अशावेळी महापालिकेने दिलेले मालमत्ता पत्रक मालमत्ताधारकांसांठी मोठी सनद आहे. मला खात्री आहे येत्या काळात उरलेल्या गावांतील घरमालकदेखील मालमत्ता पत्रकांसाठी मागणी करतील आणि पालिका त्यांना मालमत्ता पत्रक देईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रॉपर्टी कार्डमध्ये या बाबींचा समावेश
या कार्डमध्ये जमीन मालकाचे नाव आणि मालकी हक्कातील बदल, जमिनीचा सिटी टायटल सव्र्व्हे नंबर, जमिनीचे स्थान, प्लॉट क्रमांक, चौरस मीटरमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, भार आणि उत्परिवर्तन रेकॉर्ड, सरकारी संस्थांकडून जमीन मालकाने घेतलेल्या कर्जाशी संबंधित तपशील, प्रलंबित खटल्यांचा तपशील आणि जमिनीवर आकारलेल्या आणि न भरलेल्या करांचा तपशील सामावीष्ठ करण्यात आला आहे.

यासाठी आहे प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचे
प्रॉपर्टी कार्ड शहरी भागातील जमिनीचा खरा मालक प्रमाणित करतो, मालमत्ता पत्रिका शहरी भागातील जमिनींवर खोटा दावा शोधण्यात मदत करते, मालमत्ता पत्रकाचा वापर केल्यास जमीन बळकावणे टाळले जाते, शहरी भागातील जमिनीशी संबंधित न्यायालयीन खटल्यांमध्ये प्रॉपर्टी कार्डचा वापर केला जाऊ शकतो, प्रॉपर्टी कार्ड धारकाला भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण टाळण्यास मदत करेल तसेच भूसंपादन झाल्यास रितसर मोबदला मिळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड उपयोगी पडते असे या प्रॉपर्टी कार्डचे महत्त्व आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply