Breaking News

प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार -भाजप प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बुधवारी (दि.3) पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत दिली. यासाठीचे बूथ विजय अभियान आजपासून सुरू झाले असून हे अभियान सहा दिवस चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मावळ आणि रायगडमध्ये भाजपचे उमेदवार नसले तरी तेथील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले.
पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार उपस्थित होते.
या वेळी माहिती देताना अवधूत वाघ पुढे म्हणाले की, जगातील सर्वांत मोठा पक्ष भाजप आहे. बूथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बूथवरील भाजप कार्यकर्ता जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवून केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या कामे विविध विकास योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, आंतरराष्ट्रीय ख्याती या माहितीसोबतच प्रत्येक घरोघरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटून घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबद्दल लाभार्थींचे आभार मानले जाणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला किमान 51 टक्के मते पडली पाहिजेत यासाठी बूथवर कार्यकर्ते मेहनत घेणार आहेत.
6 एप्रिल रोजी भाजप आपला 44वा वर्धापन दिन साजरा करीत आहे, त्यानिमित्ताने बूथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ आजपासून सगळीकडे केला आहे, असे सांगत या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन या वेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य आहे, असेही वाघ यांनी नमूद केले. यामध्ये घरोघरी पत्रके पोहचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर, वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थीशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी समूह बैठकाही घेण्यात येतील. भाजपशी संबंधित नसलेल्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य आणि योजना पोहचवणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply