Breaking News

रायगड जिल्ह्यात तब्बल 963 रुग्णांचा नवा उच्चांक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) आजवरच्या सर्वाधिक 963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर नऊ रुग्णांचा कोविड-19मुळे बळी गेला आहे. दुसरीकडे दिवसभरात 436 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 372, अलिबाग 206, पेण 115, खालापूर 40, उरण 27, रोहा 53, कर्जत 49, माणगाव 22, महाड 21, श्रीवर्धन 15, मुरूड व सुधागड प्रत्येकी 14, पोलादपूर 12 आणि म्हसळा तालुक्यातील तिघांचा समावेश आहे; तर मृत रुग्ण खालापूर व महाड तालुक्यात प्रत्येकी तीन आणि पनवेल, पेण व मुरूड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 33,863 व मृतांची संख्या 929 झाली आहे. जिल्ह्यात 27,050 जण कोरोनामुक्त झाल्याने 5884 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply