अलिबाग : प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एक लाख 40 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे, तसेच उत्पादकता हेक्टरी 2993 किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे.
रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भातलावणी करण्यात येणार आहे. 94 हजार 557 हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यंदा प्रती हेक्टरी दोन हजार 993 किलोग्रॅम उत्पादकत घेण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वाषीर्र् प्रती हेक्टरी उत्पादकता एक हजार 917 किलोग्रॅम होती. यंदा तीन हजार 759 हेक्टरवर नागली पेरणीचे लक्षांक आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी 22 हजार 388 क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यात 22 हजार 163 क्विंटल सुधारित, तर 225 क्विंटल संकरित भात बियाणे आहेत. 21 हजार 180 मेट्रीक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. कृषी निविष्ठानवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेतून रायगड आता हळूहळू बाहेर पडू लागला आहे. शेतकरीदेखील कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे शेतकर्यांनी सुरू केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे चालू झाली आहेत. बांधबंदिस्ती, चर मारणे, ढेकाळांची उलकटनी ही कामेही जोर धरू लागली आहेत.