Breaking News

माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनकडून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनने सामाजिक बांधिलकी जपत 38 घरांना दोन हजार रूपयांची आर्थिक मद्त केली आहे.

अचानक आलेल्या चक्रीवादळाने पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील आदिवासी वाडीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदिवासी लोकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेली आहेत काही घरांच्या भिंतीसुद्धा कोसळल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनने आदिवासी वाडीतील 38 घरांना प्रत्येकी दोन हजार अशा छोट्या स्वरूपाची मदत केली आहे.

या वेळी नीलेश पाटील यांनी बोलताना माची प्रबळ हे हल्ली खूप मोठे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. हजारोंच्या संख्येने तिथे पर्यटक येतात त्यांची सेवा तेथील आदिवासी बांधव करत असतात. आता त्यांच्यावर संकट आले आहे आणि आपण त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे सांगितले तसेच त्यांनी आदिवासी बांधवाना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या वेळी उद्योजक वैभव म्हात्रे, युवा नेते भरत पाटील, भाजपचे बेलवली गाव अध्यक्ष सतिश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण पवार, ज्येष्ठ नेते संतोष पाटील, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply