Sunday , February 5 2023
Breaking News

‘सीएए’विरोधातील आंदोलनांमागे कारस्थान

पंतप्रधानांची आप, काँग्रेसवर सडकून टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘सीएए’विरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने योगायोग नाही, तर तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचे असे डिझाईन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. कायद्याला केवळ विरोध असता तर सरकारच्या आश्वासनानंतर तो संपला असता, पण आप आणि काँग्रेसची ही खेळी आहे. हे लोक देशाचे तुकडे तुकडे करण्याचा विचार असणार्‍या लोकांना वाचवत आहेत. ‘सीएए’विरोधातील आंदोलनांमागे मोठे कारस्थान आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. दिल्लीत कडकडडुमा येथे सोमवारी (दि. 3) पंतप्रधान मोदी यांची प्रचारसभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
दिल्लीचे सरकार गरीब, बेघरांना घर देण्यास इच्छुक नाही. दिल्लीत पंतप्रधान आवास योजना लागू होत नाही. जोपर्यंत दिल्लीत असे सरकार असणार, तोपर्यंत दिल्लीत लोकांच्या भल्याचे काम ते अडवणार. दिल्ली बदलायची असेल तर दिल्लीचे सरकार बदला, असे आवाहन मोदी यांनी केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करते. भाजप नकारात्मकतेत नव्हे, तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी केलेले संकल्प आमच्यासाठी मोठे आहेत. देशासमोर जी शेकडो आव्हाने होती, ती आम्ही सोडवतोय. दिल्लीतही मोठी समस्या होती. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. दिल्लीच्या 40 लाखांहून अधिक लोकांना मोठ्या चिंतेतून आमच्या सरकारने मुक्त केले आहे. तुम्हाला आता सरकारी बुलडोझरच्या चिंतेतून मुक्ती मिळाली आहे.
11 फेब्रुवारीनंतर दिल्लीत जेव्हा भाजपचे सरकार बनेल तेव्हा या सर्व कॉलनींमध्ये विकासकामे आणखी वेगाने पुढे सरकणार आहेत. दिल्ली भाजपने हाही संकल्प केला आहे की या कॉलनींसाठी डेव्हलपमेंट फंड बनवला जाईल. झोपडीधारकांना पक्की घरे मिळतील, असे आश्वासनही मोदी यांनी दिले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply