अलिबाग : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या सोमवार (दि. 7)च्या अंतिम दिवशी रायगड जिल्ह्यात 34 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघात 10, कर्जत मतदारसंघात 11, उरणमध्ये आणि महाडमध्ये प्रत्येकी आठ, पेणमध्ये 14, अलिबागेत 13 आणि श्रीवर्धनमध्ये 14 असे एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …