युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची ताकद ही संघटनात्मक बांधणीत आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शुक्रवारी (दि. 12) पनवेल येथे बैठकीत केले.
भाजप युवा मोर्चा उत्तर रायगडची जिल्हा बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ही बैठक युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी त्यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उपाध्यक्ष सुनील राणा, सचिव रवी तिवारी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल विधानसभा संयोजक रोहित जगताप, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, उपाध्यक्ष चिमय समेळ, गौरव कांडपिळे, सचिव विवेक होन, शुभ पाटील, नितेश घुगे, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, कळंबोली मंडळ अध्यक्ष गौरव नाईक, खारघर मंडळ अध्यक्ष नितेश पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष तेजस पाटील, युवा वॉरिअर उत्तर रायगड जिल्हा संयोजक देवांशु प्रभाळे, उपाध्यक्ष शिवानी घरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी हे एकत्रितपणे सर्व उपक्रम राबवत असल्याचे सांगून युवा मोर्चाने आतापर्यंत राबवलेल्या तसेच आगामी काळात राबवण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली.