Breaking News

सीकेटी महाविद्यालयात मराठी भाषा दिवस उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस व कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आगरी भाषेतील लेखक, कवी चंद्रकांत मढवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांनी आगरी भाषेतील कवितांची आणि समाज जीवनातील अनुभवांची सुरेख मांडणी केली. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. तसेच मराठी विभागप्रमुख एम. एम. कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कादंबरी पाटील व आभार प्रदर्शन मनाली महाडिक या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम यशस्वीतेबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply