पनवेल ः रामप्रहर वृत्त
वंदे मातरम् जनरल कामगार संघटना अंतर्गत पनवेल तालुक्यातील पडघे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन शनिवारी (दि. 27) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, महेश पाटील, आकाश फडके, सागर भोईर, भरत म्हात्रे, राजेश पाटील, श्रीनाथ पाटील, जगूशेठ ढोंगरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा चालक, मालक उपस्थित होते.
Check Also
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper