Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 3) आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला सुमारे 600हून मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला तसेच पनवेलकरांच्या हिताचे उपक्रम जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने सातत्याने राबवण्यात येतात त्याबद्दल कौतुक केले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही या कार्यक्रमाला भेट देत शुभेच्छा देऊन विजेत्या स्पर्धकाला बक्षीस देऊन प्रोत्साहीत केले.
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ज्युनिअर के.जी. ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी पर्यंत अशा चार गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे 600हून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल याच ठिकाणी लगेच जाहीर करण्यात आला. त्यात विजेत्याला प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच
स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांनाही प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन त्यांना प्रोत्साहीत करण्यात आले.
या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, भाजपचे जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेविका निता माळी, केदार भगत, ओबीसी मोर्चा जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते, शहर मंडल सरचिटणीस रूपेश नागवेकर, अमित ओझे, तालुका सरचिटणीस लिना पाटील, प्रभाग 18 अध्यक्ष महेश सरदेसाई, उमेश इनामदार, प्रितम म्हात्रे, सुहासिनी शिवनेकर, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply