Breaking News

बहिणींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर; आमदार महेश बालदी यांचे अभिवचन

रानसईमधील आदिवासी भगिनींसह रक्षाबंधन साजरे

उरण ः रामप्रहर वृत्त
बहिणींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचे अभिवचन आपल्या सर्वांसमोर देतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि.19) रानसईमध्ये दिले, तसेच जात, धर्म, भाषा, पंथ बघून जो काम करतो तो जातीतच गुरफटला जातो. त्यामुळे विरोधकांना माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी फक्त जातीचाच मुद्दा आहे, अशी टीकाही विरोधकांवर केली.
रक्षाबंधन सण हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण उरणचे आमदार महेश बालदी यांनी रानसईमधील आदिवासी बहिणींसोबत साजरा केला. या वेळी बहिणींना भेट म्हणून साड्यांचे वाटप केले. या कार्यक्रमाला शेकडो आदिवासी बहिणींनी उपस्थित राहून आमदार महेश बालदी यांना राखी बांधून रक्षणाचे वचन घेतले. या वेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर, रानसई विभागीय अध्यक्ष श्याम लेंडे, विद्याधर जोशी, जीवन टाकले, राजू पाटील, सरपंच राधा पारधी, उपसरपंच सुरेश पारधी, सदस्य रेखा चौधरी, बेबी शिंगवा, राधा दोरे, युवानेते समीर मढवी, दीपिका दोरे, नागेश केंगे, नारायन बरतोंड, नामदेव पारधी, महादेव भगत, अशोक कवठे, बाळाराम चौधरी, अनिल भगत, अशोक कवटे, गोपीशेठ म्हात्रे यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply