Breaking News

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल

मुंबई ः रामप्रहर वृत्त
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील विधानभवनात दाखल करण्यात आला.
राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यातील दोन जागा महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या आहेत. यापैकी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर पक्षाने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरत गोगावले, आमदार जयकुमार गोरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस अमरिश मोकल, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, सोपान जांबेकर, दिलीप भोईर, सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, चिटणीस परशुराम म्हात्रे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, पनवेल शहर चिटणीस रूपेश नागवेकर यांच्यासह विविध मंडलाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply