Breaking News

राज्यात 20 हजार पोलिसांची पदे भरणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील पोलीस विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 26) येथे दिली. सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पोलीस विभागातील भरतीबाबत यापूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहिरात काढण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी 12 हजार पदांसाठीची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलीस दलाला चांगली मदत होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply