भाजप समाजसेवेच्या भावनेतून सुविधा देतो
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजसेवेच्या भावनेतुन आणि ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेवाळी गावामध्ये पाण्याच्या टाकीचे आणि विद्युत डीपीच्या लोकार्पणावेळी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून नेवाळी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सुटला असून या गावात हाराष्ट्र जीवन प्राधिकारणाची जल वाहिनी जोडण्यात आली आहे. तसेच पाणी पुरवठाही सुरू करण्यात झाला आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी मोतीराम काथारा, नामदेव पाटील, आकाश काथारा, देवराम काथारा, राजेश काथारा यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच पाण्याच्या कनेक्शनसाठी मोतीराम काथारा यांनी दोन लाख 17 हजार, नामदेवा काथारा यांनी 50 हजार तर भैरवनाथ सोसायटीच्यावतीने 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दरम्यान, एमजेपीच्या वतीने दिवसाला दोन लाख 75 हजार लिटर पाणीपुरवठा होणार आहे. या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. पाण्याच्या प्रश्नासह आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेवाळी गावातील विजेचा प्रश्नही मार्गी लवाला आहे. नेवाली गावात स्वतंत्र विद्युत डीपी नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे
लागत होते. या संदर्भात त्यांनी महावितरणकडे स्वतंत्र डीपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मात्र महावितरणाकडे निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे नेवाळी ग्रामस्थांनी माहिती दिली असता आमदारांनी त्वरित जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून डीपीसाठी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार या डीपी बसवण्याच्या काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून या डिपीचेही लोकर्पाण या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, मोतीराम काथारा, राजेश काथारा, महादू शेळके, जगदीश शेळके, विश्वास काथारा, आकाश काथारा, शुभ पाटील, सुगंधा काथारा, प्रमोद खांदेकर, ज्ञानदेव पाटील, देवराम काथारा, विठ्ठल काथारा, महेंद्र काथारा, प्रदीप पाटील, बाबा म्हस्के, मारुती शिंदे यांच्यासह भैरवनाथ आणि मुक्तेश्वर सोसायटीचे रहिवासी, भाजपचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.