पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे सबका साथ सबका विकास ही विचारसणी तसेच पक्षाच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाच्या कामांवर प्रभावीत होऊन न्हावे गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यक्रर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शुक्रवारी (दि. 23) जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून स्मशानभुमीतील कामांसाठी 16 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या न्हावे येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षाप्रवेशावेळी शिवसेना आणि शेकापमधून गौरव भोईर, राजेश म्हात्रे, उमेश पाटील, केतन म्हात्रे, करसन ठाकूर, विष्णु म्हात्रे, कुंदन भोईर, अनिकेत भोर्ई, हेमंत भोईर, चंद्रकांत पाटील, हमकेश भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, चंद्रकांत भोईर, किशोर घरत, तुषार भोईर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर, प्रकाश कडू, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुहास भगत, सुनिता भोईर, रंजना पाटील, मीनाक्षी पाटील, जागृती म्हात्रे, ललिता भोईर, नरेश मोकल, सुनील कोळी, राजकारण कोळी, विनायक कोळी, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …